2.3/5 - (3 votes)
Majhi Ladki Bahin Yojana 2024 ladkibahin.maharashtra.gov.in new

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४

Ladki Bahini Yojana Online Form 2024 | Mazi Ladki Bahin Yojana Official Website | Ladki Bahin Yojana App | Majhi Ladki gov in
Ladki Bahin Yojana Form | Mazi Ladki Bahin Yojana Login | Ladki Bahin Yojana Online apply | Official Website | Ladki Bahin Yojana Form PDF

Official Websiteladkibahin.maharashtra.gov.in

Table of Contents

महाराष्ट्र शासनाने सन 2024 च्या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यामार्फत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी एक कल्याणकारी योजना सुरू केली या योजनेचा नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024. या योजनेमार्फत राज्यातील विवाहित, अविवाहित, निराधार तसेच पात्र सर्व महिलांना महिन्याला पंधराशे रुपये इतका आर्थिक लाभ त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात देणे हा मुख्य उद्देश आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजना काय आहे? या योजनेचे पात्रता निकष काय? या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा? या योजनेची अपात्र यादी कशी डाउनलोड करावी तसेच लाडकी बहिण योजने संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Ladki Bahini Yojana Online Form 2024

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही कल्याणकारी योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपण ऑफलाइन तसेच ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध असलेला नमुना डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागेल. तो नमुना भरून, आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून, अर्ज अंगणवाडी सेविकांना सादर करावा लागेल.

तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही नारीशक्ती दूत ॲप वरून तसेच लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरून घर बसल्या अर्ज भरू शकता किंवा नजीकच्या सीएससी आपले सरकार सेवा केंद्र मार्फत अर्ज भरू शकता. याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात पुढे पाहणार आहोत.

Mazi Ladki Bahin Yojana Official Website

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना १ जुलैपासून सुरू करण्यात आली त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती दूध या ॲपचा वापर करून सुरुवातीचे काही दिवस अर्ज भरण्यात आले त्यानंतर आता या योजनेचे अधिकृत पोर्टल जारी करण्यात आलेले आहे. तर आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या लिंक वर भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

Ladki Bahin Yojana App

माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज लाडकी बहीण योजना ॲपद्वारे भरण्यासाठी सर्वात आधी प्ले स्टोअर वर जा, तिथे गेल्यानंतर NariShakti Doot App Link असे सर्च करा. त्यानंतर तुमच्या पुढे येणारे NariShakti Doot App डाऊनलोड करून इन्स्टॉल करा व मोबाईल नंबर ने Sign Up करा

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४
कोणी सुरू केलेमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील सर्व विवाहित व अविवाहित महिला
राज्यमहाराष्ट्र
लाभ1500 रुपये प्रति महिना
उद्दिष्टमहिलांना आर्थिक मदत देणे
वर्ष2024
अर्ज पद्धतऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटladakibahin.maharashtra.gov.in

Step 1: Visit https://ladakibahin.maharashtra.gov.in/

सर्वात आधी गुगल कॉम किंवा कुठल्याही ब्राउझर मध्ये https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही लिंक टाईप करा. त्यानंतर तुमच्याकडे योजनेचे अधिकृत पोर्टल होम पेज ओपन होईल. तिथे गेल्यानंतर संपूर्ण माहिती वाचा आणि त्यानंतर अर्जदार लागेल या ऑप्शनवर क्लिक करा.

Step 2: Create Account or Sign In

अर्जदार लागेल या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Login आणि Create Account? असे दोन ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटला भेट देत असाल तर Create Account? यावर क्लिक करा.

Step 3: How to Create ladki Bahin Yojana Account?

लाडकी बहीण योजनेचे नवीन अकाउंट तयार करण्यासाठी आपण खाली सविस्तरपणे माहिती स्टेप बाय स्टेप केलेली आहे. त्यासाठी तुमच्या पुढील नवीन पेज ओपन झाल्यानंतर https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup तिथे खालील प्रमाणे सर्व माहिती टाकून तुम्ही नवीन अकाउंट तयार करू शकता.

Full Name as per Aadhar (In English)*

आधार कार्डावर जसे आहे तसे पूर्ण नाव (इंग्रजीत) येथे भरा.

Full Name as per Aadhar

आधार कार्डावर जसे आहे तसे पूर्ण नाव येथे भरा.

Mobile No.*

तुमचा वैध Mobile No. येथे भरा.

Mobile No.

तुमचा वैध Mobile No. येथे पुन्हा भरा.

Password*

तुम्हाला आवडेल असा मजबूत Password येथे भरा.

Confirm Password*

वरीलच Password पुन्हा भरा.

District*

तुमच्या राहत्या ठिकाणाचा District निवडा.

Taluka*

तुमच्या राहत्या ठिकाणाचा Taluka निवडा.

Village*

तुमच्या राहत्या ठिकाणाचे Village निवडा.

Municipal Corporation / Council

तुमच्या गावातील किंवा शहरातील Municipal Corporation किंवा Council निवडा.

Authorized Person*

अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र या पैकी तुम्हाला लागू पडणारे ऑप्शन निवडा.

Accept Terms and condition

Terms and condition वाचा आणि मान्य करून “Accept” बटनावर क्लिक करा.

Captcha*

Captcha कोड भरा.

Enter Captcha

जर Captcha स्पष्ट नसेल तर “Refresh” बटनावर क्लिक करून नवीन Captcha घ्या.

Signup

सर्व माहिती भरा आणि नंतर “Signup” बटनावर क्लिक करा.

Step 4: ladakibahin.maharashtra.gov.in login

नवीन अकाउंट तयार केल्यानंतर लॉगिन पेजवर परत या. त्यासाठी लॉगिन बटनवर क्लिक करा.

Mobile No.*

तुमचा वैध Mobile No. येथे भरा.

Password*

तुमचा Password येथे भरा.

Enter Captcha

कॅप्चा कोड नीटपणे टाईप करा.

Refresh

जर कॅप्चा स्पष्ट नसेल तर “Refresh” बटनावर क्लिक करून नवीन कॅप्चा घ्या.

Login

सर्व माहिती भरा आणि नंतर “Login” बटनावर क्लिक करा.

Step 5: Application of Mukhyamantri - Majhi Ladki Bahin Yojana

लॉग इन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक (Aadhar No.) योग्य प्रकारे भरावा. त्यानंतर, Captcha कोड दिलेल्या जागेत टाईप करा. जर Captcha स्पष्ट नसेल तर “Refresh” बटनावर क्लिक करून नवीन Captcha घ्या. सर्व माहिती नीट तपासल्यानंतर “Validate Aadhar” बटनावर क्लिक करा.

Step 6: Ladki Bahin Yojana Registration Form

तुमच्यापुढे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव इंग्रजी मध्ये आधार कार्ड प्रमाणे एंटर करा. त्यानंतर महिला विवाहित असल्यास महिलेच्या पतीचे आणि महिला अविवाहित असल्यास महिलेच्या वडिलांचे नाव एंटर करा. तसेच इतर सर्व माहिती भरा.

Step 7: Ladki Bahin Yoajana Document Upload

सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Upload all the document mentioned below. (File size must be between 50KB and 5MB.) या सेक्शन मध्ये महिलेचे सर्व कागदपत्रे जेपीजी किंवा पीएनजी फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

Step 8: Applicant’s Hamipatra / अर्जदाराचे हमीपत्र

हमीपत्र स्वीकारण्यासाठी मार्क वर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पुढे खालील प्रकारे मी पत्र वापर होईल तिथून स्वीकारा या बटनवर क्लिक करा.

  1. मी घोषित करते की,
    माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
  2. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
  3. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  4. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
  5. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा कमी आहे.
  6. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रु.१,५००/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  7. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नाही.
  8. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
  9. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  10. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

मी वरीलप्रमाणे घोषित/सत्यापित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा वन टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.

Step 9: Submit Ladki Bahin Yoajana Form

आपण भरलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि खात्रीशीर आहे याची खात्री झाल्यानंतर संपूर्ण माहिती आणि डॉक्युमेंट्स एकटा पुन्हा चेक करा आणि त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची माहिती तुमच्यापुढे प्रॉपर होईल ही एकदा वाचून कन्फर्म या बटनवर क्लिक करा तुमच्या आमच्या यशस्वीरित्या भरला जाईल.

Step 10: Ladki Bahin Yoajana Application Number

अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर तुमच्याकडे पुढील पेजवर लाडकी बहीण योजनेचा एप्लीकेशन आयडी येईल तो तुम्ही भविष्यातील वापरासाठी सांभाळून ठेवा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  2. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  3. सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेल्या कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  4. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  5. फोटो KYC साठी आवश्यक फोटो
  6. राशन कार्ड
  7. लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्थींचे पालन करण्यासाठी हमीपत्र

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार

  1. १. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  2. २. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  3. ३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  4. ४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  5. ५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

  1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  4. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  6. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  7. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

Ladki Bahin Yojana Important Link

Majhi Ladki Bahin Yojana All GRClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Official Website LinkClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra pdfClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply LinkClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Application Form pdfClick Here
Nari Shakti Doot App LinkClick here

Pros and Cons of Ladki Bahin Yojana

Pros of Ladki Bahin Yojana (फायदे)

Cons of Ladki Bahin Yojana (तोटे)

How to Download the Nari Shakti Doot App

महाराष्ट्रातील महिलांसाठी नारी शक्ती दूत ॲप पीसी किंवा अँड्रॉइड मोबाइल डिव्हाईसवर वापरण्यासाठी डाउनलोड करण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे:

  1. तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअर उघडा.
  2. सर्च मेनूमध्ये जा, “नारी शक्ती दूत ॲप” असा शब्द लिहा आणि सर्च आयकॉनवर क्लिक करा.
  3. ॲप तुमच्यासमोर लॉन्च होईल.
  4. “Install” पर्यायावर क्लिक करा.
  5. तुमच्या स्मार्टफोनवर हा ॲप डाउनलोड होईल, आणि तुम्ही सहजपणे याचा वापर करू शकता.

या पद्धतीने तुम्ही ॲप सहजपणे डाउनलोड करू शकता.

Application Process on Nari Shakti Doot App

  1. नारी शक्ती दूत ॲप उघडा.
  2. होम स्क्रीनवर “Apply Here” या पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा.
  3. एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, आवश्यक सर्व तपशील काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. “Submit” पर्यायावर क्लिक करा.

How to Register for Nari Shakti Doot?

  1. आपल्या मोबाइल डिव्हाइसवर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन लॉन्च करा.
  2. मुख्य स्क्रीनवर “Register” बटण निवडा.
  3. आता नोंदणी फॉर्ममध्ये आपले नाव, मोबाइल नंबर, आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  4. “Get OTP” बटणावर क्लिक करून ओटीपी पाठवा.
  5. तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, जो फॉर्म सबमिट करताना प्रविष्ट करावा लागेल.
  6. निर्दिष्ट फील्डमध्ये ओटीपी पूर्ण केल्यानंतर “Submit” बटण दाबा.
  7. या ॲपमध्ये तुमची नोंदणी आता पूर्ण झाली आहे.
 

लाडकी बहीण योजना - वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना सक्षमीकरण आणि आर्थिक मदत प्रदान करणे आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹1500/- आर्थिक सहाय्य देण्यात येते.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्जदार लॉगिनच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. जर तुमच्याकडे आधीपासून खाते नसेल, तर तुम्ही नवीन खाते तयार करू शकता.

तुम्ही ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉगिन करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. लॉगिन केल्यानंतर “यापूर्वी केलेले अर्ज” या विकल्पावर क्लिक करा आणि तुमच्या अर्जाची स्थिती पाहा.

अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे असू शकते:

  • Approved (मंजूर): तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.
  • Approved SMS verification pending: तुमच्या मोबाईल नंबरची स्थिती अद्याप तपासलेली नाही, परंतु तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • Pending status (प्रलंबित): तुमच्या अर्जाची अद्याप पडताळणी झालेली नाही. पडताळणी झाल्यानंतर अर्जाची स्थिती बदलली जाईल.
  • In review status (पडताळणीमध्ये): तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. लवकरच अधिकाऱ्यांमार्फत तुमचा अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट केला जाईल.
  • Rejected status (रिजेक्ट): तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहे. जर तुमच्या अर्जात एडिट बटन दिलेले असेल, तर अर्ज बदल करून पुन्हा सबमिट करू शकता. जर एडिट बटन नसेल, तर तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल.

जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल आणि एडिट बटन उपलब्ध असेल, तर तुम्ही अर्जात आवश्यक बदल करून पुन्हा सबमिट करू शकता. जर एडिट बटन नसेल, तर तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल.

पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे आहे, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.

१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
२. अधिवास प्रमाणपत्र
प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे
(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५. नवविवाहितेच्या बाबतीत
रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील
(खाते आधार लिंक असावे)

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

तुम्ही महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. पत्ता: 3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत.

 

Conclusion

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवण्याच्या सरकारच्या माणूस आहे तसेच या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी लाडके बहीण योजनेच्या अटी शिथिल करून नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी करण्यात आली आहे.

Disclaimer

https://cmladkibahinyojana.online/ ही वेबसाईट केवळ माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार केलेली आहे. ही वेबसाईट कोणत्याही प्रकारची अधिकृत सरकारी वेबसाईट नाही. या वेबसाईटवरील सर्व माहिती माहितीपूर्ण असून याचा उद्देश दिशाभूल करण्याचा नाही. कृपया अधिकृत आणि तंतोतंत माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: ladkibahin.maharashtra.gov.in.

© 2024 ladkibahin.maharashtra.gov.in